जगण्याचा अर्थ
जीवन जगण्याचा खरा अर्थ कोणता ? : शलाका गाडे आजकालच्या दैनंदिन जीवनात जीवन जगणे म्हणजे नेमकं काय? छान कपडे घालून एखाद्या ठिकाणी जाऊन छान-छान फोटो काढून सोशल मिडीया वर टाकणे, आपल्याकडे जे नाहीय ते आहे असे दाखवणे, किंवा जे आहे त्याचा जास्त दिखावा करणे. स्वतःच्या आनंदासाठी एखादा फोटो सोशल मिडीया वर टाकणे वेगळं, पण काहीवेळा मुद्दाम लोकांना जळवू या विचाराने टाकणे, एखाद्याकडे काम असेल तर गोड-गोड बोलून काम काढून घेणे मतलबा पुरते वागणे. ऐकमेकांना कमी लेखणे, एकमेकांत द्वेष निर्माण करणे, दोन गटात वाद निर्माण करणे, किंवा एकमेकांची "औकात" हा शब्द वापरून काढून एकमेकांचा खालचा वरचा दर्जा ठरवणे, एकमेकांची फसवणूक करणे, एखादा पुढे जात असेल तर त्याला मागे खेचणे, एखाद्याला संपवणे, राग , द्वेष , मत्सर, मनात ठेवणे, अजून बरच काही, असच काहीसं जीवन आजकाल आपण सगळेच जगत आहोत अस तर होत नाहीय ना ? खरा आयुष्य जगण्याचा अर्थ न ओळखता आपण आधी एक ...